बेंगलोर : क्रेडिट कार्डच्या व्यवसायामध्ये उतरण्यासाठी पेटीएम ही कंपनी आता सज्ज झाली आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारात महत्त्वाची सेवा देणारी कंपनी पेटीएम पुढच्या महिन्यात क्रेडिट कार्डच्या व्यवसायात उतरणार असल्याचे समजते. डिजिटल व्यवहारांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन कंपनीने क्रेडिट कार्ड आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी क्रेडिट कार्डची निर्मिती करणाऱया विविध फर्मशी भागीदारी करण्याचा विचारही कंपनीने केला आहे. येणाऱया 12 ते 18 महिन्यांमध्ये 20 लाखांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड बाजारात दाखल करण्याचे उद्दिष्ट कंपनीने समोर ठेवले आहे. आजही क्रेडिट कार्डना सर्वच वर्गात मागणी अधिक राहिली आहे.
Previous Articleमातीच्या दिव्यांचा व्यवसाय तीनपट वाढणार
Next Article ब्रिटानिया : 23 टक्के नफावाढ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.