नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा चटका रविवारीही वाहनधारकांना सहन करावा लागला. रविवारी डिझेलचे दर 34 ते 38 पैशांनी, तर पेट्रोलचे दर 30 ते 35 पैशांनी वाढले आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 107.59 रुपये, तर डिझेलचे दर 96.32 रुपये प्रतिलिटर आहेत. तर मुंबईत पेट्रोलची किंमत 113.46 रुपये आणि डिझेलची किंमत 104.38 रुपये प्रतिलिटरवर पोहोचली आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 108.11 रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचे दर 99.43 रुपये प्रतिलिटर आहेत. देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. देशात सातत्याने वाढणाऱया महागाईमुळे आधीच सर्वसामान्य त्रस्त असताना सातत्याने वाढणाऱया इंधन दरवाढीने लोकांच्या चिंतेत आणखी भर पडत आहे.