साताऱयातील घटना-अज्ञाताविरुध्द वडिलांची तक्रार
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील राष्ट्रीय महामार्गावर म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीत असलेल्या पुजा पेट्रोल पंपावरुन अनोळखी इसमाने 26 वर्षीय युवतीला पळवून गेले असल्याची घटना दि. 4 रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान घडली. याबाबत युवतीच्या वडिलांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार हे त्यांच्या 26 वर्षीय मुलीसमवेत साताऱयातील राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीतील पुजा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. त्यावेळी रात्री 8.30 वाजता त्यांच्या 26 वर्षीय मुलीस 25 ते 30 वयोगटातील दाढी व डोक्यास शेंडी असलेल्या आणि अंगात पांढऱया रंगाचा शर्ट व पायजमा घातलेल्या अनोळखी इसमाने जबरदस्तीने पळवून नेले आहे.
ही घटना घडल्यावर युवतीच्या वडिलांनी परिसरात शोध घेतला मात्र मुलगी मिळून आली नाही. त्यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून त्यांच्या मुलीला कोणतरी अज्ञाताने जबरदस्तीने पळवून नेले असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून या गुन्हय़ाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करत आहेत.