पेडणे / प्रतिनिधी
पेडणे तालुक्मयात शुक्रवारीही अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. सकाळी मोरजी येथे भेंडीचे झाड पडल्याने सीताकांत शेटगावकर यांच्या घराचे 10 ते 15 हजार रुपयांचे नुकसान झाले . सकाळी माऊसवाडा पेडणे येथे संजू केरकर यांच्या घरावर व कंपाऊंडवर जांभळीचे झाड पडल्याने 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. तर अग्नी शामक दलाच्या जवानांनी 50 हजार रुपयांची मालमत्ता वाचवली. सकाळी सुरबानवाडा पेडणे येथे मंदिराच्या मांगरावर झाड पडल्याने मांगराचे थोडय़ा प्रमाणात नुकसान झाले. अग्निशामक दलाचे अधिकारी जयराम मळीक , अधिकारी प्रशांत धारगळकर चालक विठ्ठल परब , दीलीप बाबरेकर, प्रशांत सावळ देसाई , सहदेव चोडणकर, विशाल पाटील , विकास चव्हाण , प्रदीप आसोलकर, मनोज साळगावकर ,शाम आरोंदेकर, शेखर मयेकर यांनी पडलेली झाडे कापून बाजूला केली.