पेडणे / प्रतिनिधी
लाॕकडाऊनचा फायदा गैर कृत्य करणारे उठवत असतात. कोरोना लॉकडाऊन काळात चोख पोलीस बंदोबस्त असतानाही काही चोरटे चोऱया करण्याच्या तयारीत असतात तर काहीजण यात यशस्वीही होतात माञ पेडणे पोलिसांच्या नजरेतून हे चोरटे सुटले नाहीत . अशीच एक पेडणे पोलिसांनी मोठी कारवाई करताना मोटारसायकल चोरी करणारे तिघांना पकडले. 25 लाख किमतीच्या 15 मोटारसायकली पेडणे पोलिसांनी जप्त करून तीन संशयित सायमन डिसोझा 23 पर्वरी , डेन्झिल फर्नांडीस 31 करासवाडा व गाॕर्डन फर्नांडीस 20 शिवोली यांना अटक करत मोठी कारवाई केली.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 रोजी चोपडे येथे एक युवक संशयित रित्या फिरत असल्याची माहिती पोलिसाना मिळाली . हि माहिती मिळताच , उपनिरीक्षक संजित यांनी सदर युवकाला ताब्यात घेतले . त्यानंतर गाॕर्डन आग्नेलो फर्नांडिस यांना ताब्यात घेतले. त्यांनी आपण वाहने चोरून कुणाला देतो त्यांची नावे दिली . पोलिसांनी सर्व माहिती घेवून पोलीस अधीक्षक गजानन प्रभुदेसाई , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर , उपनिरीक्षक संजीत कानोळकर , उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी , उपनिरीक्षक हरीश वायंगणकर , पोलीस कॉस्टेबल अनंत भाईडकर रुपेश कोरगावकर , विजय गावस , साबाजी राऊळ , महेश केरकर , संदीप गावडे आदींनी कारवाई करत तिन्ही चोरटय़ांना पकडून त्यांनी राज्यातील विविध भागातून चोरलेल्या 15 मोटारसायकली जप्त करून त्याना अटक केली ..
पेडणे पोलिसांनी संशयित सायमन डिसोझा 23 पर्वरी , डेन्झिल फर्नांडीस 31 करासवाडा व गाॕर्डन फेर्नांडीस 20 शिवोली , यांच्यावर भारतीय दंड सहिता कलम 379 , 411 r/w 34 आयपीसी खाली गुन्हा नोंद केला .
पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.