नवी दिल्ली
पेप्सीको कंपनीने उत्तर प्रदेशात बटाटा चिप्स निर्मितीचा कारखाना सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकल्पाकरीता 814 कोटी रुपये खर्च येणार असून प्रकल्प मथुरेत उभारला जाणार आहे. सदरच्या कारखान्याच्या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार असून 2021 च्या मध्यावर व्यावसायिक उत्पादन घेण्याला सुरूवात होणार असल्याचे पेप्सीकोकडून सांगण्यात आले. मथुरा जिल्हय़ातील कोसी येथे 35 एकर क्षेत्रफळावर हा प्रकल्प उभारला जाणार असून उत्तर प्रदेश राज्य औद्योगिक विकास मंडळाने आवश्यक जमीन उपलब्ध करून दिली आहे.