प्रतिनिधी/ सातारा
फिर्यादी घरात झोपलेली असताना दि. 24 मार्च 2018 मध्ये 2 वाजण्याच्या सुमारास घरामध्ये अनाधिकाराने प्रवेश करून फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याने आरोपी मच्छिंद्र विठ्ठल चव्हाण (वय 46, रा. एमआयडीसी सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुह्याप्रकरणी त्याला 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या गुह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. के. ए. धरणे यांनी करून मा. न्यायालयात आरोपीविरूद्ध दोषारोपत्र दाखल केले होते. यावेळी 7 साक्षीदार तपासण्यात आले. केवळ परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदार यांच्या आधारे आरोपी मच्छिंद्र चव्हाण याला 3 वर्ष सक्तमजुरी व 1 हजार रूपये अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या केसमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, आर. एल. फरांदे, पोलीस हवालदार शमशुद्दिन शेख, गजानन फरांदे, सुधीर खुडे, महिला पोलीस नाईक रिहाना शेख, पोलीस कॉन्टेबल राजेंद्र कुंभार, महिला पोलीस कॉन्टेबल अश्विनी घोरपडे, पोलीस कॉन्टेबल अमित भरते यांनी तपासात योग्य ती मदत केली.