वृत्तसंस्था/ इसबर्ग
डेन्मार्कमध्ये झालेल्या मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या महिला बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांनी महिला दुहेरीत उपविजेतेपद पटकाविले.
महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात डेन्मार्कची टॉप सीडेड जोडी ऍमेलिया मॅगेलुंड आणि रॅव्हेन यांनी अश्विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांचा 15-21, 21-19, 21-14 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत फ्रान्सच्या पोपोव्हकडून हार पत्करावी लागली.