ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतासह जगभरातल्या बंगाली जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘शुभ नोबो बर्षो’ असे ट्वीट करत पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
बंगाली जनतेची जीवनाविषयी ओढ आणि उत्सव साजरे करण्याचा उत्साह अवर्णनीय आहे. पोयला बौइशाख निमित्त भारतासह जगभरातल्या बंगाली जनतेला शुभेच्छा.
नवे वर्ष सर्वांसाठी समृद्धी, आनंद आणि आरोग्यदायी राहो अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.