प्रतिनिधी / बेळगाव
व्यावसायिक, व्यापारी आणि दुकानदारांनी आपल्या उत्पादनाचे दुकानाबाहेर प्रदर्शन करू नये, तुमच्याकडे येणाऱया प्रत्येक ग्राहकांची सर्व माहिती नोंद करून घ्या, त्याचा मोबाईल क्रमांक किंवा फोन क्रमांक नोंद करून ठेवा. अशा महत्त्वाच्या सूचना बेळगाव उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांनी व्यापाऱयांना दिल्या आहेत.
राज्यातील आणि जिल्हय़ातील कोरोना रुग्णाची संख्या वाढू लागल्याने प्रशासन त्याबाबत पुन्हा गांभीर्याने विचार करत आहेत. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर काही अंशी लॉकडाऊनच्या नियमांच्या पालनाबाबत शिथीलता दिसून येत आहे. याच पार्श्वभुमीवर बेळगाव उत्तर विभागाचे राघवेंद्र सुहास यांनी व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार यांची तातडीची बैठक शुक्रवारी बोलाविली. या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या.
ते म्हणाले, तुमच्या उत्पादनाचे बाहेर प्रदर्शन करू नका, कोविडचे जे नियम आहेत. त्याचे पालन करा, म्हणजेच मास्क वापरा, सॅनिटायझरचा उपयोग करा, जर शक्मय असेल तर थर्मोमीटर्स वापरा. शिवाय तुमची दुकाने आस्थापने यांचे निर्जंतुकीकरण करा. अशा सूचनाही राघवेंद्र सुहास यांनी केल्या.
व्यापाऱयांनी या सर्व सूचना ऐकून घेतल्या. आणि आम्ही कोविड 19 च्या नियमांचे पालन करीत आहोत. परंतु रस्त्यावरील विपेते, लहानसहान विपेते, असंख्य भाजी विपेते, रस्त्यावर बसून विक्री करत आहेत. त्यांच्यापैकी फार कमी जण मास्क वापरतात. सध्या मास्क वापरण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे या घटकांनीसुद्धा लॉकडाऊनचे नियम गंभीर्याने घेणे आवश्यक आहे. याकडे राघवेंद्र सुहास यांचे लक्ष वेधले. सध्या सर्व दुकानदार आणि व्यापारी या नियमाचे पालन करत आहेत, असेही व्यापाऱयांनी स्पष्ट केले.