साताऱयातील 35 जणांची फसवणूक
गोडोली/ विजय जाधव
हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न हजारो विद्यार्थ्यांना दाखवत मालामाल झालेली प्रंकफिन इन्स्टिटय़ूट बोगस असल्याचे उघड झाले आहे. देशात 115, महाराष्ट्रातील 17 प्रँचायजींमधून हजारो तर साताऱयातील एका प्रँचायजीतून 35 विद्यार्थ्यांची शिक्षण घेवून ही पदवी मिळाली नसल्याने फसवणूक झाली आहे. राज्यात 7 ठिकाणी या इन्स्टिटय़ूटच्या संचालकावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने फी परत देण्याचा आदेश दिला आहे. मात्र सदर फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप काहीच मिळाले नसल्याचे समोर आले आहे.
देशात 2010 पासून एअर हॉस्टेस ट्रेनिंगच्या नावाखाली प्रँकफिन इन्स्टिटयूट ऑफ एअर हॉस्टेस ही बोगस प्रमाणपत्राच्या आधारे व्यवसाय संस्था सुरू केली. दिल्लीस्थित संचालकांनी देशभरात जवळपास 115 शाखांचा विस्तार केला. प्रत्येकी लाखो रूपये घेऊन करार पध्दतीने प्रँचायजी दिल्या गेल्या. त्यात साताऱयात 2011 मध्ये एक प्रँचायजी सुरू झाली होती. एका बॅचमध्ये 25 ते 30 विद्यार्थी आणि त्यांच्याकडून 6 महिने, 1 वर्षाच्या अभ्यासक्रम कोर्ससाठी 78 हजार ते 1 लाख 50 हजार रूपयांची फी घेतली गेली. मात्र ना परीक्षा, ना प्रमाणपत्र, ना कराराप्रमाणे अटीशर्तींचे पालन केले गेले. त्यावरून सातारच्या प्रँचायजी संचालकांनी मुख्य कार्यालयाशी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे आणि अरेरावीची भाषा ऐकावी लागली. इतर प्रँचायजी संचालकांशी संपर्क केला असता त्यांनाही फसवणुकीचा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून महाराष्ट्रात साताऱयात एक, औरंगाबाद येथे एक, पुणे येथे पाच अशा फसवणुकीच्या तक्रारी पोलिसांत आणि थेट गृहमंत्र्याकडे झाल्या आहेत.
त्यानंतर न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर तंत्रशिक्षण संचालकांना चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यांच्या चौकशीत व्यवसाय प्रमाणपत्रावर असलेले विल्यम डॅनियल हे नाव आणि मान्यता नोंदणी प्रमाणपत्र बोगस असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला. त्यावर विद्यार्थ्यांची घेतलेली फी आणि प्रँचायजींचे खर्च शुल्क परत देण्याचा न्यायालयाने आदेश दिला असताना ही अद्याप पर्यंत एका ही विद्यार्थ्यांला एक दमडी ही परत दिली गेलेली नाही.
सध्या देशभरातील विविध ठिकाणच्या प्रँचायजींचे संचालकांची लाखो रूपयांची नुकसान झाले असून त्याची भरपाई आणि विद्यार्थ्यांची फी परत मिळविण्यासाठी आता नव्याने न्यायालयात हेलपाटे मारणे सुरू झाले आहे. गुन्हा दाखल होऊन ही अद्याप कोणावर कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे.