आपण निवृत्त होत असल्याचे पक्षाला कळविले : काँग्रेससमोर पुन्हा प्रश्नचिन्ह.दिव्या विश्वजित राणेंचा मार्ग मोकळा
प्रतिनिधी /पणजी
राणे कुटंबामध्ये झालेल्या वादावर तोडगा म्हणून अखेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना त्यांनी तसे कळविले. यामुळे गेले कित्येक दिवस पर्यें संदर्भात निर्माण झालेला सस्पेन्स संपुष्टात आला. त्याचबरोबर राणे घराण्यात निर्माण झालेल्या राजकीय वादळावरही पडदा पडला.
राणे यांच्या या निर्णयामुळे त्यांची सून दिव्या राणे यांचा भाजपतर्फे पर्ये मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला.
उमेदरावारी अर्ज भरण्यास अखेरचे दोनच दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतापसिंह राणे यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतला. तसे त्यांनी काँग्रेस पक्षाला प्रजसत्ताक दिनी अधिकृतरीत्या काळविले. पक्षाच्या गोव्यातील पदाधिकाऱयांनी पक्षशेष्ठींना यासंदर्भात कळविले असता काँग्रेसने पर्येतील गावकर या व्यक्तीचे नाव उमेदवार म्हणून सूचित केले आहे.
पन्नास वर्षांची देदीप्यमान कारकीर्द
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात 1972 मध्ये प्रथम विधानसभेच्या मगोच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणारे प्रतापसिंह राणे 1977, 80, 84, 1989, 94, 99, 2002, 2007, 2012 आणि 2017 ची निवडणूक अशा अकरा विधानसभा निवडणुकीत तर अगोदर सत्तरीत व नंतर पर्ये मतदारसंघातून अखंडितपणे विजयी झाले. भाऊसाहेब बांदोकडरांपासून आजपर्यंत अपवाद ठरलेले प्रतापसिंह राणे यांनी अखंडित पन्नास वर्षे विधानसभा सदस्यत्व प्रप्ता करून गोमंतकाची सेवा केली.
वय झाल्यामुळे आपण निवृत्त होत असल्याचे पक्षाला त्यांनी कळविले असले तरीदेखील या राजकारणामुळे गृहकलह निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी विधानसभेला बाय बाय केले.