येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे आवाहन
प्रतिनिधी /येळ्ळूर
बेळगाव महापालिकेच्या निवडणुका 3 सप्टेंबर रोजी होत आहेत. त्या निवडणुकीसाठी मराठी भाषिकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने प्रत्येक वॉर्डात म. ए. समितीचा एकच उमेदवार असावा, अशी कळकळीची विनंती केली आहे. तेव्हा प्रत्येक वॉर्डातील पंचमंडळीचा आदर करून तसेच पंचमंडळींनीही विश्वासात घेऊन एकच उमेदवार द्यावा, असे आवाहन येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सीमाप्रश्नाच्या लढय़ाला बळकटी येण्यासाठी बेळगाव महापालिकेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता स्थापन करणे गरजेचे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे एकजूट दाखविली आहे तशीच एकजूट महापालिकेच्या निवडणुकीत दाखवावी आणि मराठी भाषिक उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन अध्यक्ष शांताराम कुगजी, सेपेटरी प्रकाश अष्टेकर, कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी यांनी केले आहे.