सिंधुपुत्राची थरारक कथा : केपटाऊन ते जर्मनी जाणारे प्रवासी जहाज
तेजस देसाई / दोडामार्ग:
संपूर्ण जगभरात कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’मुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात केवळ जमिनीवर राहणारेच नव्हे तर समुद्रात संचार करणाऱया अनेक खलाशांनाही मोठा फटका बसला आहे. साऊथ आफ्रिकेतील केपटाऊन ते जर्मनी या दरम्यान जलवाहतूक करणारे असेच प्रवासी जहाज समुद्रात अडकले आहे. फेसाळणाऱया समुद्रात हेलकावे घेणाऱया या जहाजावर आपल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील एकजण आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱयामधील शिवापूर गावातील सूरज राजाराम पालकर याने ‘तरुण भारत’शी संपर्क साधत या जहाजावरील थरारक अनुभव कथन केले.
कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे जलवाहतूक करणाऱयांसमोरही समस्या उभ्या राहिल्या आहेत. किंबहुना त्यांना मोठय़ा संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोना (कोविड 19) हा संपूर्ण जगाला हादरवून टाकणारा एक महाभयंकर रोग आहे. त्याचे थैमान अजूनही जगभरात सुरू आहे. सध्या अजून बरेच भारतीय परदेशी नोकरीनिमित्त आहेत.
सूरज पालकर हा जर्मन क्रूझलाईन कंपनीच्या जहाजांमधील एका पॅसेंजर जहाजात इंजिन विभागात कामाला आहे. ‘कोरोना’सारख्या रोगामुळे भयभीत परिस्थिती मी इथे अनुभवली आणि अनुभवतही आहे. नेहमीप्रमाणे जहाजात 9 मार्चला केपटाऊन (साऊथ आफ्रिका) येथे जुने पॅसेंजर जाऊन नवीन 1243 पॅसेंजर चेक इन झाले. सर्वकाही योग्य प्रकारे चालत असताना अचानक 13 मार्चला म्हणजे पाचव्या दिवशी एकाच पॅसेंजर परिवारातील तीन पॅसेंजरचे टेंपरेचर जास्त निघाल्याने एकच खळबळ उडाली. ते तीन आणि सहाव्या दिवशी अजून तीन असे सहा पॅसेंजर मिळाल्याने सर्वात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अर्थात, ते पॅसेंजरच्या ज्या कोणाच्या सहवासात आलेले ते सर्व कामगार पूर्ण साखळी, त्या पॅसेंजरना वेगवेगळय़ा रुममध्ये आयसोलेट करण्यात आले. जहाज लगेच पुन्हा केपटाऊनकडे (साऊथ आफ्रिका) वळविण्यात आले. 23 मार्चला केपटाऊन येथे पोहोचल्यावर साऊथ आफ्रिकेने बंद पुकारल्याचे समजले. परंतु, तपासणी करता जहाज बंदरावर घेणे भाग पडले. 25 मार्चला आलेले तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे समजताच जीवात जीव आला.
पण या कालावधीत कोरोनाने सर्वत्र हाहाकार पसरवल्याने जास्तीत जास्त देशांनी बंद पुकारला होता. त्यामुळे जर्मनीने चार्टर विमाने पाठवून सर्व पॅसेंजरला सुरक्षित साऊथ आफ्रिका ते जर्मनीत नेले. त्यानंतर राहिलेला प्रश्न म्हणजे 457 कामगारांचा. जहाजाने साऊथ आफ्रिका येथे एक महिना पुरेल, असे सर्व खाद्यपदार्थ, बंकरिंग करुन 26 मार्चला दुपारी युरोपमध्ये जाण्यास प्रवास सुरू केला आणि आज आम्ही 11 एप्रिल 2020 ला स्पेन देशातील टेनेरिफ या बंदराजवळ पोहोचणार होतो. त्यात बंदराने 457 एवढी जास्त प्रवासी संख्या असल्याने परवानगी फेटाळली.
परवानगी नाकारल्याने जहाज समुद्रातच
त्यामुळे जहाज समुद्रातच जवळपास आहे. कंपनीच्या मुख्य ऑफिस (रॉस्टोक, जर्मनी) मधून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत चालल्यामुळे घेतलेल्या निर्णयात जास्तीत जास्त 110 कामगार ठेवून बाकी सर्वांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पण, तो निर्णय पूर्णत्वास येण्याकरिता पहिले जहाजाला बंदरात येण्याची परवानगी आणि दुसरे म्हणजे भारतीय, युरोपियन, इंडोनेशियन, श्रीलंकन, फिलीपिन्स, म्यानमार या सर्व देशांत लॉकडाऊन उघडणे आवश्यक आहे. कंपनीने चार्टर विमानाने 457 कामगारांपैकी 347 कामगारांना घरी पाठवायचे ठरविले आहे.
प्रतीक्षा लॉकडाऊन संपण्याची
आता सर्व वाट पाहत आहेत ती बंदराने परवानगी देण्याची आणि
त्या 347 च्या लीस्टमध्ये आपले नाव आहे का, ते पाहण्याची ! सर्वांनी आपली आणि कुटुंबाची
काळजी घ्या. आपल्या सर्वांच्या सहकार्याने या रोगावर मात अटळ आहे. केंद्र सरकार आणि
राज्य सरकारच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करूया आणि या रोगावर विजय नक्कीच मिळवून
आपल्या देशाला पुन्हा एकदा
प्रगतीपथावर नेऊया, असे सूरज याने
सांगितले.