प्रतिनिधी/ बेळगाव
वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी मागील आठवडय़ापासून विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. विकेंड कर्फ्यूच्या काळात प्रवाशांच्या संख्येत मोठी घट होत आहे. त्यामुळे परिवहनच्या महसुलावर परिणाम होत आहे. सकाळच्या सत्रात काही मोजक्मया बस विविध मार्गांवर धावल्या. मात्र, दुपारनंतर प्रवाशांची संख्या रोडावल्याने बस थांबून होत्या.
मध्यवर्ती बसस्थानकात उचगाव, कुदेमनी, अनगोळ, राणी चन्नम्मा विद्यापीठ, देवराज अर्स कॉलनी, होनगा, बस्तवाड, मण्णिकेरी, धामणे, अलारवाड, राजगोळी, मुचंडी यासह लांबपल्ल्याच्या निपाणी, हुक्केरी, अथणी, चिकोडी, धारवाड, गोकाक, दावणगेरी आदी बस पाहायला मिळाल्या. मात्र, प्रवाशांचा अल्पप्रतिसाद मिळाल्याने बसचालक व वाहकांना प्रवाशांच्या प्रतीक्षेत थांबावे लागले. काही गावच्या बस प्रवाशांअभावी थांबविल्याने प्रवासीही बसच्या प्रतीक्षेत बसलेले पाहायला मिळाले.
बाजारपेठेसह बँक, सोसायटय़ा, शाळा, सरकारी कार्यालये यासह इतर बऱयाच गोष्टी बंद होत्या. प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे बसफेऱयाही कमी झाल्या होत्या. प्रवाशांच्या संख्येनुसार काही बस मार्गावर धावल्या. मात्र, काही बस प्रवाशांअभावी बसस्थानकात थांबून होत्या. बसस्थानकात स्थानिक प्रवाशांची संख्या घटली होती. लांबचा प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्याही नगण्य होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात काही बसच्या एक-दोन फेऱया झाल्या. मात्र, दुपारनंतर बसस्थानकात शुकशुकाट पसरला होता.
विकेंड कर्फ्यूचा परिवहनला फटका
मागील आठवडय़ापासून विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आल्याने शनिवार-रविवार प्रवाशांच्या संख्येत मोठी घट होत आहे. त्यामुळे परिवहनला दोन दिवसांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या परिवहनला विकेंड कर्फ्यूचा फटका बसला आहे.
गोवा राज्याच्या बस बेळगावात
राज्यात विकेंड कर्फ्यू जारी असला तरी गोवा राज्याच्या बस स्थानकात दाखल झाल्या होत्या. बेळगाव-गोवा असा प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीखातर गोवा शासनाने कर्नाटकात विकेंड कर्फ्यू सुरू असला तरी आपली बससेवा सुरू ठेवली होती. कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसदेखील गोव्याकडे गेल्या होत्या.