निपाणीनजीकही उभारले तपासनाके : नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक
प्रतिनिधी / निपाणी
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा फैलाव वाढत चालल्याने कर्नाटक प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. शनिवारपासून कोगनोळी येथून सीमाभागात प्रवेश करताना प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जात आहे. रविवारी मध्यरात्रीपासून कोरोनाविषयक कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नव्या नियमावलीनुसार 48 ते 72 तासांच्या आतील कोरोना निगेटिव्ह अहवाल असेल तरच प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी निपाणीनजीकही मुरगूड रोडवर रविवारी रात्री तपासणी नाका उभारण्यात आला आहे.
शनिवारीच कर्नाटक शासनाने कोरोना निगेटिव्ह अहवाल असेल तरच कर्नाटकात प्रवेश देण्याचा आदेश दिला आहे. मात्र पर्यटन अथवा अन्य कामानिमित्त कर्नाटकात तसेच महाराष्ट्रात गेलेल्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दोन दिवस सदर आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. मात्र सोमवारपासून कोगनोळीत तसेच निपाणीनजीक मुरगूड रोडवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्मयांवर मोठय़ा प्रमाणात पोलीस प्रशासन तसेच महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात असणार आहेत. प्रशासकीय कर्मचाऱयांना तपासणी नाक्मयांवर हजर राहण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.
… तर निर्बंध आणखी कडक
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ आदी राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्या तुलनेत कर्नाटकात रुग्णसंख्या अत्यल्प आहे. असे असले तरी सदर रोगाचे गांभीर्य ओळखून याचा पुन्हा फैलाव होऊ नये, यासाठी कर्नाटक सरकारने तात्काळ पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह अहवाल असेल तरच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. यानंतरही रुग्णसंख्या वाढत गेल्यास हे निर्बंध आणखी कडक केले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी व नागरिकांनीही सतर्कता बाळगून कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
निपाणी पोलीस ऍक्टिव्ह
शासनाने आदेश देताच निपाणी पोलीस ऍक्टिव्ह झाले आहेत. त्यानुसार मुरगूड रोडनजीकच्या तपासणी नाक्मयावर प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्याबरोबरच कोरोना निगेटिव्ह अहवालाची तपासणीही केली जाणार आहे. अहवाल नसल्यास कोणत्याही परिस्थितीत सदर प्रवाशास कर्नाटकात प्रवेश दिला जाणार नसल्याचे शहर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांनी सांगितले.
कोगनोळी टोलनाक्मयाला प्रांताधिकाऱयांची भेट ! दुसऱया दिवशीही प्रवाशांची तपासणी
कोगनोळी ः गेल्या चार-पाच दिवसापासून नजिकच्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकöमहाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी टोलनाक्मयावर महाराष्ट्रातून येणाऱया सर्वच प्रवाशांची तपासणी करून कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. कोरोना संसर्ग रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी युकेशकुमार यांनी रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान कोगनोळी येथे भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.
यावेळी तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी मल्लिकार्जुन उळागड्डी, चिकोडी तालुका वैद्यकीय अधिकारी विठ्ठल शिंदे, आयुक्त महावीर बोरन्नावर, एम. आर. कोतवाल, रविकांत सी. एम., एस. एस. शेटी आदी उपस्थित होते.
तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोगनोळी टोलनाक्मयावर तहसील कार्यालय विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्राम पंचायत प्रशासन यांच्या वतीने कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आशा कार्यकर्त्या व आरोग्य केंद्राचे कर्मचारी महाराष्ट्रातून येणाऱया प्रत्येक वाहनांमधील प्रवाशांची थर्मल स्कीनिंगद्वारे तपासणी करत आहेत.
प्रवाशांचे बसमध्ये थर्मल स्क्रीनिंग
दरम्यान, आंतरराज्य प्रवासावर काही प्रमाणात निर्बंध आले आले असले तरी बससेवेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या नेहमीप्रमाणे कर्नाटक व महाराष्ट्र महामंडळाची बससेवा निपाणीत सुरू आहे. निपाणीतून कोल्हापूर, पुणे आदी मार्गावर बस धावत आहेत. बसमध्येही प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जात आहे. सध्या बससेवा सुरू असली तरी बससेवा बंद ठेवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे निपाणी आगाराचे व्यवस्थापक मंजुनाथ हडपद यांनी सांगितले.