संबंधितांवर कारवाईसाठी देवस्थान रक्षण समितीचे निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
होनगा येथील भैरवनाथ मंदिराची नुकतीच यात्रा झाली. यात्रेनंतर देणगी पेटय़ा मंदिराच्या व्यवस्थापन समितीने उघडल्या आहेत. वास्तविक धर्मादाय संस्थेची परवानगी नसताना या देणगी पेटय़ा उघडणे चुकीचे आहे. तेव्हा त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी देवस्थान रक्षण समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आता या मंदिरावर प्रशासक नेमण्यात आले आहेत. असे असताना कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना देणगीपेटय़ा उघडण्यात आल्या आहेत. नुकतीच यात्रा झाली. त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी या देणगीपेटय़ा उघडल्या असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तेव्हा या प्रकाराची चौकशी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी रमेश चिकोर्डे, गजानन पावले, प्रसाद पाटील, भाऊसाहेब चिकोर्डे यांच्यासह देवस्थान रक्षण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.