ऑनलाईन टीम / मुंबई :
प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे मुंबईत निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. मागील आठवढ्यापुर्वीच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. चेंबूरमधील एका रुग्णालयात उपचरादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वाजिद हे बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक असलेल्या साजिद- वाजिद जोडीतील एक होते.रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी त्यांची प्रकृती अधिक खालावली, त्यातच त्यांचे निधन झाले. वाजिद यांना किडनीचा आणि हृदयविकाराचा त्रास होता. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. रविवारी उत्तररात्री त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाली असली तरी वाजिद यांचे निधन किडनी निकामी झाल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूडने एका उमद्या संगीतकाराला मुकलं आहे. अभिनेता सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडगोळीने श्रवणीय संगीतसाज चढवला होता.