Pranic Healing या पूरक उपचार पद्धतींमध्ये हात न लावता एखाद्या आजारावर उपचार कसा करायचा हे शिकवल जातं. मास्टर चोआ कॉक सुई यांनी अतिशय सोप्या शब्दांत pranic healing चा अभ्यासक्रम तयार केला आहे. आतापर्यंतच्या लेखांमध्ये आपण pranic healing कसं काम करतं, त्याचे कोर्स कोणते आहेत याविषयीची माहिती वाचली. आजच्या लेखात Pranic Crystal Healing या कोर्सविषयी माहिती घेणार आहोत.
पृथ्वीवर, जमिनीखाली, खडकांमध्ये किंवा जलाशयांच्या तळाशी सापडणारे जे काही मौल्यवान खडे किंवा तत्सम टणक व शोभिवंत वस्तू आहेत, त्यांना रत्ने म्हणतात. त्यांतल्या 9 मौल्यवान रत्नांना भारतीय ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नऊ रत्नांचा उल्लेख नवरत्ने असा होतो. नवग्रहांच्या गतीच्या व अवकृपेच्या मानवी जीवनावर होणाऱया तथाकथित वाईट परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी ज्योतिषी काही विशिष्ट रत्न वापरण्याचा सल्ला देतात. चंद्र, रवि, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू यांनाच ज्योतिषी नवग्रह मानतात.
प्राणिक क्रिस्टल हीलिंगमध्ये आपण प्राणिक उपचार तत्त्वे आणि क्रिस्टल्सच्या नैसर्गिक शक्तीचा वापर करून तंत्र वापरण्यास शिकवले जाते. मानसिक हल्ल्यांपासून संरक्षणात्मक ताबीज म्हणून क्रिस्टल्स कसे वापरावे, तसेच अंगठी, पेंडेंट आणि दागिने कसे वाढवायचे, उपचार, समृद्धी आणि स्वतःचे संरक्षण वाढवण्यासाठी हे क्रिस्टल वापरले जातात. प्राणिक क्रिस्टल हीलिंग पुस्तक क्रिस्टल्सचे गुणधर्म शिकवते. क्रिस्टल्सच्या वापराने आपली उपचार शक्ती वाढवते, क्रिस्टल्सची साफसफाई, चार्जिंग आणि प्रोग्रामिंग, डोकेदुखी, ताप, मासिक पाळीतील अस्वस्थता, संधिवात, उच्च रक्तदाब, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि बरेच काही दूर करते.
कोणत्या हेतूंसाठी कोणते स्फटिक आणि दगड योग्य आहेत हे शिकणे महत्वाचे आहे. पॉवर रिंग्ज वापरणे, जादूगार आणि मास्टर हीलर्सचे रहस्य, शक्ती, उपचार आणि समृद्धीसाठी शिकून घ्यावेत हाच मास्टर चोआ यांचा उद्देश आहे. जलद उपचार सुलभ करण्यासाठी रंग स्फटिकांच्या रंग प्राणिक शक्तींचा वापर केला जातो. विशिष्ट ऊर्जा अँकर करण्यासाठी क्रिस्टल्स वापरणे शिकवले जाते. मानसिक हल्ला शोषून घेण्यासाठी आणि वळवण्यासाठी विशेष क्रिस्टल्स वापरले जातात.
क्रिस्टलच्या वर्गात आम्हाला आमच्या सरांनी एक गंमत सांगितली. त्यांनी आम्हाला विचारलं एका मोठय़ा गोळय़ात बघून भविष्य सांगणारी बाई तुम्ही पाहिली आहे का? बऱयाच जणांनी ‘हो टीव्हीमध्ये खूपदा पाहिलंय’ , असं अपेक्षित उत्तरं दिली. तेव्हा आमचे सर म्हणाले, की क्रिस्टलला स्वतःची इच्छा नसते तुम्ही जे करायला सांगणार तेच क्रिस्टल करणार…. Crystals don’t have will. एखाद्या पाळीव कुत्र्याला आपण उठ म्हटल्यावर तो उठेलच असं होत नाही ह्याच कारण काय की त्या कुत्र्याला इच्छा आहे. त्याची इच्छा झाली तुमचं ऐकायची तर तो तुम्ही उठ म्हटल्यावर उठणार आणि जर त्याला उठायचं नसेल तर नाही उठणार. अशीच इच्छा क्रिस्टलला नसते म्हणूनच क्रिस्टल्स नेहमी त्यांना जी ऑर्डर दिली जाते ते तितकीच follow करतात. त्यामुळे काचेच्या गोळय़ात भविष्य दिसत नसावं असा प्राथमिक अंदाज आहे.
या वर्गात तुम्हाला तुम्ही वापरत असलेला क्रिस्टल कसा चार्ज करायचा हे शिकवलं जातं. आता क्रिस्टल चार्ज करायचा म्हणजे नेमकं काय करायचं हे आपण पाहू. उपचारक जेव्हा क्रिस्टलने एखाद्या पेशंटला उपचार देत असतो तेव्हा दूषित ऊर्जा काढायचं काम आणि चांगली ऊर्जा देण्याचं काम क्रिस्टल करत असतो. ही ऊर्जा येते कुठून? आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे ही ऊर्जा आपण निसर्गातून घेतो. सूर्य, हवा, जमीन इथून ती ऊर्जा घेतली जाते. क्रिस्टल मिठाच्या पाण्याने धुवून स्वच्छ केले की थोडावेळ उन्हात ठेवले जातात मग ते चार्ज होतात. क्रिस्टल चार्ज करण्याच्या अजूनही काही पद्धती आहेत ज्या तुम्हाला Crystal Healing या कोर्समध्ये शिकवल्या जातात. उपचारासाठी वापरले जाणारे क्रिस्टल हे नेहमी स्वच्छ करून वापरले जातात. एखाद्या पेशंटला healing देत असताना दूषित ऊर्जा काही प्रमाणात त्या क्रिस्टलमध्ये येण्याची शक्मयता असते किंवा प्रत्येक क्रिस्टल हा वेगळय़ा पेशंटसाठी वेगळा प्रोग्राम केला जातो. यासाठी प्रत्येक वेळी healing देताना क्रिस्टल स्वच्छ करून वापरण्याचा सल्ला मास्टर चोआ नेहमी देतात.
क्रिस्टलच्या बाबतीत सांगण्यात आलेली गोष्ट आपण आपल्या ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार जे खडे घालतो त्यावर सुद्धा लागू होते. वाचकांपैकी जर कुणाच्या बोटात खडे असतील तर ते एकदा मिठाच्या पाण्याने धुवून मग घाला. खडा हा नेहमी विशिष्ट कार्यासाठी घातला जातो. जेव्हा मिठाच्या पाण्याने तुम्ही त्या खडय़ातील दूषित ऊर्जा स्वच्छ करणार आहात तेव्हा तो खडा आपोआप जलद गतीने काम करेल. Pranic Healing हा एक वेगळा विषय वाचकांपर्यंत पोहोचतो तेव्हा बरेच फोन येतात, वाचक आवर्जून प्रतिक्रिया कळवतात तर आजच्या लेखात खडय़ाचा सांगितलेला नुस्का नक्की करून पहा आणि आम्हाला तुमची प्रतिक्रिया कळवा.
-आज्ञा कोयंडे