‘सोना’च्या माध्यमातून अभिनेत्रीची नवी सुरुवात
अभिनेत्री प्रियांका चोप्राने न्यूयॉर्क शहरात स्वतःचे रेस्टॉरंट सुरू केले आहे. यासंबंधीची माहिती तिनेच समाजमाध्यमांवर दिली आहे. या भारतीय रेस्टॉरंटचे नाव ‘सोना’ असून चालू महिन्याच्या अखेरपर्यंत त्याची सेवा सुरू होणार आहे. प्रियांकाच्या या रेस्टॉरंटमध्ये भारतीय खाद्यपदार्थ मिळणार आहेत. स्वतःच्या पोस्टमध्ये प्रियांकाने नेमप्लेट आणि पती निक जोनास याच्यासोबतच्या रेस्टॉरंटमधील पुजेची काही छायाचित्रे प्रसारित केली आहेत.
सोना रेस्टॉरंट अशा भारतीय फ्लेवर्सचे प्रतीक आहे, ज्यांच्यासोबत मी लहानाची मोठी झाली आहे. माझ्या या रेस्टॉरंटच्या किचनचे संचालन शेफ हरि नायक करणार आहेत. त्यांनी अत्यंत स्वादिष्ट आणि इनोव्हेटिव्ह मेन्यू तयार केला आहे. हा मेन्यू माझ्या उत्तम देशाच्या खाद्ययात्रेवर नेणार असल्याचे उद्गार प्रियंकाने काढले आहेत.
मॅट्रिक्स-4 मध्ये दिसणार
प्रियांका लवकरच हॉलिवूडच्या दोन चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. टेक्स्ट फॉर यू आणि मॅट्रिक्स-4 मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टेक्स्ट फॉर यूमध्ये प्रियांकासह सॅम ह्यूगन आणि सेलीन डायोन मूख्य भूमिकेत आहेत. तर मॅट्रिक्स-4 मध्ये कियानू रीव्स, कॅरी-एन्नी मॉस आणि नील पॅट्रिक हॅरिस यासारख्या कलाकारांसोबत प्रियांका मुख्य भूमिकेत आहे.