सध्या संपूर्ण जग हे इंटरनेटमुळे एकत्र आल्या कारणाने या लॉकडाऊनमध्ये देखील सर्वाना घरबसल्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत होती, आणि याच संधीचा फायदा घेत आगामी विविध मराठी सिनेमांच्या घोषणा होत गेल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी मराठी चित्रपट ष्स्टोरी घफ लागिरंष् चे टिझर मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नेटकर्यांच्या उदंड प्रतिसाद नंतर जी के फिल्मस क्रियशन निर्मिती त्यांचा स्टोरी ऑफ लागिरंष् हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात जून 2021 रोजी प्रदर्शित करणार असल्याची घोषणा सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स वरून करण्यात आली आहे. मोठय़ा पडद्यावर येण्याच्या दमदार तयारीत असलेला रोहित राव नरसिंगे दिग्दर्शित स्टोरी घफ लागिरंष् सिनेमा प्रेमाची नवीन व्याख्या सांगणारा आहे.
चित्रपटाचे निर्माता बंडू मेश्राम आणि दिग्दर्शित रोहित राव नरसिंगे यांचा हा पहिला सिनेमा आहे.स्टोरी ऑफ लागिरंश् या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतच संपले असून, या चित्रपटाचे दिग्दर्शिन रोहित राव नरसिंगे यांनी केले आहे तर जी के फिल्मस क्रिएशन निर्मित संस्थेअंतर्गत बंडू नामदेव मेश्राम यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात रोहित राव नरसिंगे सोबत चौताली चव्हाण आणि ऋतूजा आंद्रे,मोहन जाधव सोमनाथ येलनुरे आणि मराठी चित्रपट सफष्टीमधील चमकतां तारा संजय खापरे क्रिन शेअर करणार आहेत. काही दिवसांपूर्वी श्स्टोरी ऑफ लागिरं‘ या चित्रपटाचा मोशन लोगो लूक प्रदर्शित करण्यात आला होता, या लोगो लूकमध्ये टीमसोबत कलाकारांची माहीती देण्यात आली होती.
या चित्रपटात रोहित राव नरसिंगे फक्त ऍक्शन सीन नाही तर तो ऋतूजा आद्रे सोबत रोमान्स देखील करताना दिसणार आहे. एका चाहत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ऋतूजा आद्रे रोहितच्या मिठीत असल्याचे पाहायला मिळतय तर चौताली चव्हाण रोहितच्या एकतर्फी प्रेमात असल्यांच दिसतय.त्याचप्रमाणे संजय खापरे यांचा रोहित राव नरसिंगे वर असलेला राग दिसून येतोय. फोटो शेअर करत चाहता म्हणतेय श्मी आज खूप उत्सुक आहे कारण रोहित राव नरसिंगे सोबत स्टोरी घफ लागिरं या आगामी सिनेमाचं शूटिंग पुर्ण झालय. त्यासोबतच आमच्या टीमला तुम्ही भेटायला तयार आहात ना? अशा आशायाचं पॅप्शन चाहत्याने त्या फोटोला दिले आहे.
या सिनेमात रोहितच्या प्रेयसीचा मफत्यू होतो त्यामुळे त्याची प्रेयसी लांब जाते आणि यात शुभांगी इनामदार हे पात्र त्याच्या सोबती म्हणून राहतं. यानंतर ही मुलगी बिघडलेल्या मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते आणि त्याला एक चांगली व्यक्ती बनवते. अजून कोणत्या नव्या गोष्टी असतील ही माहिती सध्या गुलदस्त्यातचं आहे, त्यामुळे या सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकचं राहील.
रोहित राव नरसिंगे या सिनेमात रोहितची मूख्य भूमिका साकारणार आहे तर, ऋतूजा आंद्रे त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. चौताली चव्हाण अक्षयला सुधारणारी व्यक्तीच्या भूमिकेत दिसेल.संजय खापरे हे या चित्रपटात एका पोलीस इन्सपेक्टर तर सोमनाथ येलनुरे व मोहन जाधव त्याच्या मित्राच्या भुमिकेत दिसणार आहेत.संजय खापरे,प्रेमा किरण,मिलिंद दास्ताने कास्ट असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.