प्रतिनिधी/ रत्नागिरी
कुवारबाव येथे अज्ञात कारणातून प्रौढाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल़ी ही घटना मंगळवारी 26 रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडल़ी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद यशवंत कांबळे (45, ऱा अष्टविनायक सोसायटी, कुवारबाव, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आह़े या बाबत मृत मिलिंद कांबळे यांचा भाऊ राहुल यशवंत कांबळे (42, ऱा अष्टविनायक सोसायटी, कुवारबाव, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस स्थानकात खबर दिल़ी मंगळवारी सायंकाळी मिलिंद कांबळे घरातील रुममध्ये पेपर वाचत बसले होत़े काही वेळाने राहुल यांची मुलगी स्वरा ही खेळणी आणण्यासाठी त्यांच्या रुममध्ये गेल़ी मात्र रुमचा पुढील दरवाजा बंद होत़ा म्हणून ती मागील बाजूने रुममध्ये गेली असता रुमचा लाईट बंद होत़ा तसेच तिला काका मिलिंद उभ्या अवस्थेत दिसले. तिने ही बाब आपल्या वडिलांना म्हणजेच राहुल कांबळे यांना सांगितल़ी ही बाब समजताच राहुल यांनी रुममध्ये धाव मारली असता मिलिंद हे लोखंडी बारला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसल़े राहुल यांनी या बाबतची खबर तत्काळ शहर पोलीस ठाण्यामध्ये दिल़ी पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेहाचा पंचनामा केल़ा या प्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत़