ज्यूसच्या डब्यांपासून दुधाच्या पाकिटांचा वापर
जगात प्लास्टिक वाढल्याने अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. प्लास्टिकच्या कचऱयाचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. याचमुळे प्लास्टिक कमी करण्याची मोहीम सुरू झाली आहे. विविध कंपन्या, लोक स्वतःच्या पातळीवर प्लास्टिकचा वापर रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. इक्वेडोरच्या एका कंपनीने याच दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. कंपनी प्लास्टिकच्या कचऱयाचा वापर करून घराची निर्मिती करत आहे.
इक्वाप्लास्टिक ही कंपनी 2008 पासून प्लास्टिक कचऱयाला पुनर्वापरक्षम करण्याचे काम करत आहे. दूधाची पाकिटं, ज्यूसचे रिकामी डबे आणि अन्य प्लास्टिक कचऱयाचा वापर करत स्वस्त सामग्री म्हणजेच फर्निचर, दरवाजे, विटांची निर्मिती करते. याच विटांच्या मदतीने घर उभारले जात असून त्यात लोक वास्तव्य करू लागले आहेत.
ऑफिसची निर्मिती
इन टेट्रापॅकने निर्माण झालेल्या सामग्रीमध्ये लो कार्बन इम्पॅक्ट असतो. कंपनीने स्वतःचे कार्यालय देखील याच प्लास्टिक आणि ऍल्युमिनियमच्या कचऱयाचा वापर करत निर्माण केले आहे. कंपनीने 3 लाखांहून अधिक दूधाच्या एक लिटरच्या पाकिटांचा आणि ज्यूसच्या डब्यांचा वापर करत 90 चौरस मीटरची निर्मिती केली आहे. ऍल्युमिनियम आणि प्लास्टिकने तयार या पदार्थाला इकोपॅक नाव देण्यात आले आहे.
दूधाच्या डब्यांनी उभारले घर
कंपनीने पहिल्यांदा कचऱयाच्या ढिगातून दूधाच्या 12 लाख डब्यांना जमवून एक घर उभारले आहे. हे घर भूकंपप्रतिरोधक असून अत्यंत भीषण हवामानातही तग धरणारे आहे. प्लास्टिकचा वापर करून निर्माण होणाऱया घरासाठी येणारा खर्चही खूपच कमी आहे.