कासेगाव / वार्ताहर
ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून एकाची २२ लाख रुपयांची फसवणूक करून एक वर्षापासून फरारी असलेला आरोपी कपिल विजय राठोड (रा. उमरखेड जि. यवतमाळ) याला कासेगाव पोलिसांनी चाकण जि.पुणे येथून अटक केली असून न्यायालया समोर हजर केले असता आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फरारी आरोपीचा शोध घेण्याबाबत पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम, अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबूले, उपविभागिय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी आदेश दिला होता. आरोपी पुणे येथील चाकण येथे येणार असल्याचे गुप्त बातमीदारा मार्फत गुन्हे प्रकटीकरण पथकाला माहीती मिळाली होती. स. पो. नि. अविनाश मते यांनी कासेगांव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो.हे.कॉ. चंद्रकांत पवार, पो.कॉ. राहुल पाटील, दिपक घस्ते, प्रशांत मोटे यांना आरोपीचा शोध घेणेकामी पुणे येथे पाठविले. पोलीस पथकाने आरोपीस १४ फेब्रुवारी रोजी शिताफिने पकडुन ताब्यात घेतले व न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. १७ रोजी आरोपीस दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.