प्रतिनिधी /बेळगाव
उर्दू भाषिक पत्रकार फारुख हन्नान यांच्या पत्रकारीतेच्या प्रवासावर अमानुल्लाह निजामी यांनी शब्दबद्ध केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच हॉटेल नियाज येथे करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विजापूर अरेबिक कॉलेज इंडीचे मौलाना शाकीर हुसेन व अध्यक्ष म्हणून फिरोज सेठ उपस्थित होते.
यावेळी अमानुल्लाह म्हणाले, फारुख यांनी आपल्या पत्रकारीतेतून देशाची एकात्मता, मुस्लीम समाजाचा विकास आणि उर्दू भाषेचे अस्तित्व यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. फिरोज सेठ यांनी फारुख यांच्या राजकीय पत्रकारितेचा उल्लेख
केला. यावेळी अंजुमन-ए-इस्लाम बेळगावचे अध्यक्ष आसीफ सेठ, मुस्ताक हुसेन फारुखी जमात-ए-इस्लामीचे रियाज अवटी, नियाजचे इरशाद सौदागार हे उपस्थित होते. प्रारंभी मुफ्ती नौशाद जाहीद यांनी कुराण पठण केले.