प्रतिनिधी /बेळगाव
अळवण गल्ली, शहापूर येथील फिजिकल हॅण्डीकॅप असोसिएशनतर्फे सोमवारी जिल्हय़ातील शंभरहून अधिक दिव्यांग व्यक्तींना अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले. लॉकडाऊनमुळे अनेक दिव्यांगांना घरी बसण्याची वेळ आल्याने त्यांना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
क्हाईस ऑफ स्पेशली एबल्ड पिपल यांच्यावतीने हे साहित्य असोसिएशनकडे देण्यात आले. यावेळी फिजिकल हॅण्डीकॅप असोसिएशनचे आरीफ वालीकर, सेपेटरी गिरीश सव्वाशेरी, संचालक वीणा स्वामी, राजेश शिंदे, दयानंद दड्डीकर, वामन कट्टी, राघवेंद्र अणवेकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.