भाजपात दाखल झालेल्या नगरसेवकांचा निषेध व्यक्त
प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा पालिकेत सध्या भाजपने अन्य नगरसेवक आयात करून खुर्चीवर बसविले आहेत. प्रत्यक्षात हे नगरसेवक फक्त देखाव्याचे पुतळे असून त्यांचा बोलविता धनी दुसराच आहे. म्हापशेकारांचो एकवटच्या उमेदवारांना परिवर्तनासाठी आणि भाजपा नको म्हणून जनतेने मते दिली. मात्र चारजण फुटून भाजपात दाखल झाले आणि आता अन्य काहीजण फुटण्याच्या बेतात आहे. अशा फुटलेल्या फुटीर नगरसेवकांना आम्ही उघडे पाडणार आहे. या फुटण्यामागचे कारण काय हे आम्ही त्यांच्या वाडय़ावाडय़ावर जाऊन उघड करणार आहोत. जेणेकरून यापुढे कुणीही उमेदवार फुटून दुसरीकडे जाणार नाहीत. कोविडनंतर ही मोहीम आम्ही काँग्रेसपक्ष हाती घेणार आहे अशी माहिती काँग्रेसचे उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी व्यासपीठावर कार्यकारिणी सदस्य सुदीन नाईक, उत्तर गोवा महिला काँग्रेस अध्यक्ष मिताली गडेकर, नवशाद शेख, युवा अध्यक्ष मंजू तिवरेकर उपस्थित होते. भाजपा सत्तेवर आली तेव्हा प्रत्येकवेळी त्यांना लालच झाली त्यावेळी त्यांनी डेमोक्रेशीला कधीच मान दिला नाही मग की पालिका असो वा पंचायत. मडगाव कुंकळीत त्यांचा पराभव झाला. जिल्हा पंचायत कशी झाली तिही सर्वांना माहीत आहे. कोविडच्या नावे त्यांनी राज्यभर घोटाळा चालविला आहे.
आम्ही सदैव आवाज उठविल्याने काँग्रेसने म्हापशात 10 हजार मतांचा टप्पा पार केला
म्हापसा पालिका, मतदारसंघ, शहर दरवेळी विरोधात राहिली आहे. काँग्रेसचा उमेदवार येथे आला नाही. गेली 25 वर्षे आम्ही पाहिले आहे येथे कुणीही विरोधक नव्हता तेव्हा काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहिला आहे. म्हापशात काही झाले नसल्यास आम्ही जाब विचारला आहे. म्हापसा शहर हे उत्तर गोव्याची राजधानी आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटक म्हापशात येतात. आता म्हापशात पालिका घडली. 2015 मध्ये 15 चे 20 नगरसेवक केले. भाजपच्या केडरला जागा देण्यासाठी हे वॉर्ड राखीव केले. डिलीमीटेशन करून आपल्या नागरिकांना सामावून घेतले. नगरसेवक तुषार टोपले यांनी आपल्या वॉर्डातील कामे झाली नसल्याने आवाज उठविला. रस्ते, भाजी मार्केट, बसस्थानकावर आम्ही सदैव आवाज उठविला त्यामुळे 2019 मध्ये काँग्रेस 10 हजाराहून अधिक मते घेऊ शकले. आम्ही प्रचार केला की भाजपच्या उमेदवारांना घरी पाठवा हे नागरिकांनी ऐकले.
खुर्चीसाठी आणि पैशासाठी नगराध्यक्षांनी आपला मान गमविला
2020 मध्ये ओबीसीचे नाटक केले सत्तेसाठी भाजपने आपला स्वार्थ पाहिला. चार नगरसेवक भाजपला पाठिंबा द्यायला आले. खुर्चीसाठी आणि पैशांसाठी नगराध्यक्षांनी आपला मान गमावला. तारक व विकास आरोलकर हे दोघेही भाऊ फुटले, विराज फडतेही भाजपात दाखल झाले. लोकांनी ही पालिका केली खरी मात्र जनतेचा या नगरसेवकांनी विश्वासाघात केला. भाजपने 10 आमदार नेले तेव्हाही ते विकासासाठी परिवर्तन केले होते असे आमदारांनी सांगितले. मात्र एकूण परिवर्तन पाहता म्हापशात कधीच परिवर्तन झालेले आम्हाला पहायला मिळाले नाही. जोपर्यंत भाजप सत्तेवर आहे तोपर्यंत म्हापसाचा विकास कधीच होणार नाही. यावरून स्पष्ट जाणवते असे भिके म्हणाले.
सध्या सुधीर कांदोळकर तळय़ात मळय़ात
सुधीर कांदोळकर कुठे आहे हे त्यांना माहीत नाही. ते सध्या तळय़ात मळय़ात आहे. 2019 त्यांना तिकीट दिली तेव्हा सुधीरनी सांगितले, आपण भाजप प्रमाणे काँग्रेसमध्ये काम करणार. भाजपने आपल्यावर अन्याय केला. कांदोळकर यांनी दोन वर्षात काँग्रेसमध्ये काहीच काम केले नाही. प्रथम त्यांचे पॅनलचे 4 जण कसे फुटले हे त्यांनी दाखवून द्यावे. शुभांगी पंधरा दिवस पूर्वी गेली. 2019 मध्ये सुधीरला तिकीट दिली खरी पण राजकारणापेक्षा आपण काय बोलतो ही त्यांना माहिती असली पाहिजे. आपले सहा असले तरी विरोधी म्हणून त्यांनी फॉर्म भरायला पाहिजे होते. या वृत्तीचा आपण निषेध करतो. हा अहवाल आपण काँग्रेसपक्ष श्रेष्ठीला पाठविला आहे आणि श्री. कांदोळकरांवर कारवाई झाली पाहिजे. अद्याप सुधीर कांदोळकरांना भाजपचा मोह आहे काय? हा प्रश्न आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असे उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके म्हणाले.
काँग्रेसने पालिकेत ठामपणे विरोधात रहायला हवे होते
ही निवडणूका पक्ष पातळीवर झाली नाही. निवडणुकीपूर्वी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीशी बैठका घेतल्या आहे व नंतर भाजप विरोधात मते द्यावी असेही पत्रकार परिषदेतून बोलून दाखविले आहे. आम्ही म्हापशेकारांचो एकवटला पाठिंबा दिला होता. काँग्रेसने विरोधात ठामपणे रहायला पाहिजे होते अशी माहिती भिके यांनी दिली. 2019 मध्ये 20 नगरसेवक होते. बेनकर अपक्ष निवडून आले होते. ते काँग्रेसचे सदस्य नंतर ते भाजपकडे वळले. आम्ही फक्त म्हापशेकारांच्या समस्या घेऊन पुढे गेलो आहोत. जेथे चूक होते तेथे काँग्रेसपक्ष पुढे राहणार. टिका उत्सवाची गरज काय. फक्त भाजपच्याच नागरिकांना बोलावणार. मरण व औषधावर राजकारण करू लागले तर हा भाजपचा कसला पक्ष आहे. अद्याप खूप घोटाळे गोष्टी बाहेर येणार आहे असे श्री. भिके म्हणाले.
बॉक्स करणे
म्हापसा काँग्रेस उमेदवाराबाबत पक्षश्रेष्ठीशी चर्चा करूनच निर्णय
यापुढे काँग्रेसच्या म्हापशात उमेदवार सुधीरच असणार काय असा प्रश्न पत्रकारांनी भिके यांना केला असता या विषयाबाबत आताच बोलणे योग्य नव्हे. यावर आपण योग्यवेळी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठीनी 80 टक्के नवीन चेहऱयांना संधी देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही हा विषय योग्यवेळी बोलू असे भिके म्हणाले. उत्तर गोवा, मुख्य कमिटी, पक्षश्रेष्ठी आदी सर्वावर चर्चा करूनच याबाबत निर्णय होईल. अशी माहिती श्री. भिके यांनी दिली.
0529map15
म्हापसा ः पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष विजय भिके बाजूस कार्यकारिणी सदस्य सुदीन नाईक। उत्तर गोवा महिला अध्यक्ष मिताली गडेकर, नवशाद शेख, युवा अध्यक्ष मंजू तिवरेकर.