प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली. विशेषकरून फूल बाजाराला चांगलाच बहर आला. गणेश हे अनेकांचे आराध्य दैवत. या देवतेची विशेष पूजा करण्यात भक्त धन्यता मानतात. तसेच श्रीमूर्तीसमोर आरास करणे हा अनेकांचा हौसेचा भाग आहे. विपेत्यांना याचा अंदाज असल्याने गुरुवारी पहाटेच फुलविपेते बाजारपेठेत दाखल झाले.
अशोकनगर येथील फुलमार्केट तर गर्दीने फुलून गेले. शेवंती, झेंडू, ऍस्टर, डेलिया, जरबेरा, केवडा, कमळ, तसेच झेंडूच्या माळा, अबोली व मोगरीच्या माळा यांच्या राशी सर्वत्र पहायला मिळत होत्या. अशोकनगर फुलमार्केटमधून होलसेल खरेदी करून बाजारपेठेत त्यांची विक्री करणारे अनेक विपेते आहेत. त्यामुळे फुलांची आवक होताच किरकोळ विपेत्यांनी तेथे गर्दी केली. तसेच या ठिकाणी अनेकविध फुले मिळतात, याची कल्पना असणाऱया नागरिकांनीसुद्धा खरेदीसाठी गर्दी केली.
अशोकनगरबरोबरच नरगुंदकर भावे चौक येथेही फुलांच्या राशी घेऊन विपेते पहाटेच दाखल झाले. मात्र होलसेलपेक्षा अर्थातच दर चढा होता. कमळ, केवडा, झेंडू, शेवंती, गुलाब या फुलांची येथे अधिक प्रमाणात खरेदी झाली. श्रावणापासून फूल बाजाराला बहर आला आहे. आता गणेशोत्सवानंतर नवरात्र व पुढे दिवाळीपर्यंत फूल बाजाराला महत्त्व प्राप्त होणार आहे. होलसेल मार्केटमध्ये फुलांचे दर आवक वाढल्यामुळे काही प्रमाणात घसरले. परंतु विक्री चांगली झाल्याने विपेतेही खूश झाले.