वृत्तसंस्था/ नोसेल (फ्रान्स)
फ्रान्समध्ये झालेल्या 2023 च्या नोसेल आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्मयपद भारतीय ग्रॅण्डमास्टर पी. इनियानने पटकाविले. या संपूर्ण स्पर्धेत इनियान अपराजित राहताना त्याने नऊ फेऱयांमध्ये 7 गुणांसह विजेतेपद मिळविले.
सदर स्पर्धेत सहभागी झालेला भारताचा 20 वषीय ग्रॅण्डमास्टर इनियानने पाच सामने जिंकले असून चार सामने बरोबरीत सोडविले. नऊ फेऱयांच्या या स्पर्धेत इनियानने एकही पराभव पत्करला नाही. आठव्या फेरीअखेर ग्रॅण्डमास्टर इनियान आणि भारताचा आणखी एक बुद्धिबळपटू एन. आर. विघ्नेश यांनी समान गुण घेतले. त्यानंतर अंतिम फेरीत इनियानने टोनी लेझोव्हला बरोबरीत राखले. तर 25 वषीय विघ्नेशला शेवटच्या फेरीतील डावात नॉर्वेच्या स्टॉम्बर्गकडून हार पत्करावी लागली. इनियानने 7 गुणांसह विजेतेपद तर विघ्नेशने 6.5 गुणांसह दुसरे स्थान घेतले. भारतीय ग्रॅण्डमास्टर कार्तिक वेंकटरमनने या स्पर्धेत 6.5 गुणांसह चौथे स्थान तसेच पी. शाम निखिलने 5.5 गुणांसह सातवे स्थान मिळविले.