फोंडाघाट वार्ताहर – तुषार नेवरेकर
फोंडाघाट चेकनाक्यावरील कोविड च्या काळामध्ये जिल्ह्याच्या सुरक्षेकरिता व जिल्ह्याबाहेरील येणाऱ्या प्रवाश्यांची नोंद व संशयितांची तपासणी करण्यासाठी आरोग्यपथक व शिक्षकांची नेमणूक केली आहे. त्या साठी महसूल विभागाने त्याचे ऊन वारा व पावसापासून संरक्षण होण्यासाठी शेड बांधून दिली पण पावसामध्ये ही शेड मात्र कुचकामी ठरताना दिसून येत आहे. पावसात या शेडमध्ये पावसाचे पाणी आल्यामुळे त्यांना आलेल्या प्रवाश्यांची नोंद करून घेने तसेच संशयित प्रवाश्यांची टेस्ट करणे या सारख्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहे.
तसेच त्या ठिकाणी असलेल्या साहित्याचे पण नुकसान होत आहे. शिक्षक व आरोग्य पथकाला शेजारच्या पोलीस चेकपोस्टचा आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे त्या चेक पोस्ट वर सोशल डिस्टसिंग ठेवता येत नसल्याने कोरणाचा संसर्ग होण्याचा धोका पोलीस आरोग्य पथक अधिकारी व शिक्षकांना होण्याचा धोका संभवत आहे.