फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समितीतर्फे देवी महालसेला नमन
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समितीने मागील 42 वर्षापासून म्हार्दोळ येथील महालसा देवीला नमन घालून शिमगोत्सवाला प्रारंभ करण्याचा पायंडा घातलेला आहे. त्याला अनुसरून पारंपारिक लोकसंस्कृतीचे जतन व संर्वधन करण्याची धुरा आजच्या युवकांवर आहे. कष्टकरी समाजाला व्यासपीठ मिळवून देणाऱया शिमगेत्सवाला सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन प्रियोळचे नवनिर्वाचित आमदार गोविंद गावडे यांनी केले.
म्हार्दोळ येथील महालसा देवीला ओटी अर्पण केल्यानंतर गाऱहाणे घालून शिगमोत्सवाला सुरूवात करण्यात आली. म्हार्दोळ येथील बाजार प्रकल्प येथून ढोल ताश्याच्या गजरात नमन मिरवणूक महालसा देवस्थानपर्यंत काढण्यात आली. यावेळी प्रियोळचे आमदार गोविंद गावडे सपत्नीक हजर होते. त्याशिवाय नगरसेवक विश्वनाथ दळवी, रितेश नाईक, अशोक नाईक, किशोर नाईक, हनुमंत नाईक, सुदेश भिंगी, अशोक नाईक, किशोर नाईक, गुरूनाथ उर्फ भाई नाईक व असंख्य शिमगोप्रेमी उपस्थित होते.
आमदार गावडे पुढे बोलताना म्हणाले की सर्वाच्या संघटीत कार्यामुळे फोंडय़ातील अंत्रुज शिगमोत्सव समितीने आपला आदर्श निर्माण केला असून ही एकजूट कायम ठेवा. येत्या 19 मार्च रोजी फोंडयात होणाऱया राज्यस्तरिय शिमगोत्सव मिरवणूकीत सर्व शिमगोप्रेमींनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून लोककला सादर करणाऱया कलाकारांचा उत्साह वाढवावा असे आवाहन केले.