प्रतिनिधी /फोंडा
भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱयांदा भाजपाचे केंद्रीय निरीक्षक नरेद तोमर आणि एक मुरूगन यांनी डॉ. प्रमोद सावंत यांची सार्थ निवड केलेली आहे. फोंडा भाजपा मंडळातर्फे डॉ सावंत यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱया इनिंगसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहे. मंडळ अध्यक्ष व कार्यकर्त्यातर्फे फटाके लावून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी भाजपा मंडळाचे नगरसेवक विरेंद्र ढवळीकर, परेश सावंत व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 2022 ची विधानसभा निवडणूक लढविण्यात आली होती. पहिल्या कार्यकाळात कोरोना महामारीमुळे डॉ. सावंत यांना लाभलेला तीन वर्षाचा कार्यकाळात केवळ महामारीत झुंजण्यात गेला यंदा मिळालेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केंद्रातील मोदी सरकारचा भक्कम आधारामुळे राज्यात डॉ. सावंत सरकार नवनवीन समाजपयोगी योजना राबविण्यावर भर देवो, प्रगतीशील स्वयंपुर्ण गोवा घडवून एक आदर्श ठेवावा असा विश्वास व्यक्त केला. डॉ. सावंत यांनी राज्यभर आपली छाप टाकलेल्या युवा मुख्यमंत्र्याला सलग दुसरी टर्म मिळाल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यानाही नवउर्जा मिळेल अशी आशा विश्वनाथ दळवी यांनी व्यक्त केली.