प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड आयसोलेशन सेंटरला बेळगाव तालुका व शहर फोटो आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली. 20 हजार 100 रुपयांची आर्थिक मदत समितीच्या पदाधिकाऱयांकडे देण्यात आली. म. ए. समितीने लोकसहभागातून सुरू केलेल्या आयसोलेशन सेंटरला मदतीचा ओघ सुरूच आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डी. बी. पाटील, सेपेटरी संजय हिशोबकर, सभासद संतोष पाटील, बाळू सांगुकर, राज शिंदोळकर, दीपक वांदे, रमेश पाटील यांसह इतर फोटोग्राफर्सनी आर्थिक मदत मदन बामणे व अंकुश केसरकर यांच्याकडे सोपविली. मागील दोन वर्षांपासून फोटोग्राफी व्यवसाय अडचणीत असूनसुद्धा आपला खारीचा वाटा असोसिएशनने उचलला आहे.