ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने 20 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तिथे आतापर्यंत 20 लाख 36 हजार 755 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 46 हजार 273 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
फ्रान्समध्ये मंगळवारी 14 हजार 524 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 625 जणांचा मृत्यू झाला. 20.36 लाख रुग्णांपैकी 1 लाख 43 हजार 152 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 18 लाख 47 हजार 330 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत फ्रान्सचा जगात चौथा क्रमांक लागतो. तिथे आतापर्यंत 1 कोटी 92 लाख 75 हजार 371 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.