इतके खाद्यपदार्थ मिळतात की ग्राहक होतो हैराण
किंमत जाणून तुम्हीही व्हाल दंग
जर तुम्ही कुठल्या बुफेवाल्या हॉटेलमध्ये खायला गेलात तर लोकांकडे खाण्यासाठी किती पर्याय असतील हे तुम्हाला माहित असेल. अनेकदा तर बुफेतील प्रत्येक डिशची चवही चाखण्यापूर्वी पोट भरून जाते. पण अनेक हॉटेल्समध्sय बुफेसंबंधी नियम असतात, ज्यामुळे तम्ही काही निवडक खाद्यपदार्थांचीच चव चाखू शकता. पण एका हॉटेलमधील बुफेत जर तुम्ही एकदा जेवलात तर तुम्हाला दीर्घकाळ भूकच लागणार नाही.
फ्रान्सच्या नारबोनमध्ये लेस ग्रँड्स नावाचे हॉटेल असून ज्याचा बुफे केवळ त्या शहरात नव्हे तर पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. हॉटेलचा बुफे सर्वांना हैराण करणारा असतो. तेथे पोटपूजा करण्यासाठी गेलेल्या लोकांसमोर इतके पर्याय असतात की ते गोंधळून जातात.
हॉटेलमध्ये ग्राहकांना 111 प्रकारच्या पेंच डिशेज आणि 70 प्रकारच्या वाईन मिळतात. त्यांच्यासमोर सर्व भोजन एकत्र सजवून ठेवण्यात येते, यापैकी काही गोष्टी निवडणे ग्राहकासाठी अत्यंत अवघड ठरते. पैसे दिल्यावर तुम्ही हवे तितके खाऊ शकता. खाण्यावर तेथे कुठलेच बंध नाही.
हे हॉटेल 1989 मध्ये सुरू झाले होते. तेव्हापासून ते ग्राहकांना स्वतःच्या रुचकर प्रेंच खाद्यपदार्थांनी आकर्षित करत आहे. याचा बुफे अत्यंत भव्य प्रकारे सजविण्यात येतो, जे ग्राहकांना अत्यंत पसंत पडते. 2018 मध्ये या हॉटेलने स्वतःचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविले होते.
हॉटेलने जगातील सर्वात मोठा चीज प्लॅटर तयार केला होत. या प्लॅटरमध्ये 111 प्रकारचे प्रेंच चीज होते. चालू वर्षी सप्टेंबर महिन्यात 1,10,000 लोकांनी हॉटेलसाठी बुकिंग केले होते. यातून या हॉटेलसाठीची मागणी लक्षात येते. येथील रुचकर भोजन तुम्ही केवळ 50 डॉलर्स म्हणजेच सुमारे 3,700 रुपयांमध्ये ग्रहण करू शकता.