चीनच्या आरोग्य प्रशासनाने क्विंगदाओ शहरात आयात करण्यात आलेल्या फ्रोजन माशाच्या पाकिटाच्या आवरणावर जिवंत कोरोना विषाणू मिळाल्याची पुष्टी दिली आहे. चायनीज सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने फ्रोजन खाद्यपदार्थांच्या पाकिटाच्या आवरणावर जिवंत विषाणू मिळण्याची ही जगातील पहिलीच वेळ असल्याचे म्हटले आहे.
क्विंगदाओ शहरात अलिकडेच कोविड-19 चे एक क्लस्टर समोर आले होते. प्रशासनाने शहरातील सर्व 1.1 कोटी नागरिकांची चाचणी करविली होती. जुलैमध्ये चीनने माशांच्या आयातीवर तात्पुरती बंदी घातली होती. पाकिट आणि कंटेनरच्या अंतर्गत भागात हा विषाणू आढळला होता. क्विंगदाओमध्ये आयात कॉड माशाच्या पाकिटाबाहेर जिवंत विषाणू मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
शहरातील अलिकडेच संक्रमण समोर आल्यावर त्याच्या स्रोताच्या तपासादरम्यान हा खुलासा झाला आहे. जिवंत कोरोना विषाणूने संक्रमित डब्यांच्या संपर्कात आल्यास संक्रमण फैलावू शकतो हे यातून स्पष्ट होते. परंतु ही पाकिटे कुठल्या देशातून आली होती हे सांगण्यात आलेले नाही.