महाराष्ट्रात 4 सुविधा केंद्रे – किराणा व्यवसायाचा करणार विस्तार
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑनलाइन इ कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्ट येणाऱया काळामध्ये महाराष्ट्रामध्ये व्यवसाय विस्तार करून चार हजार जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे.
फ्लिपकार्ट येणाऱया काळामध्ये महाराष्टा^मध्ये चार नवीन सुविधा केंदे सुरू करणार आहे ज्याअंतर्गत 4 हजार जणांना थेट नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वॉलमार्टच्या मालकीची असणारी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट यांनी भिवंडी आणि नागपूर या ठिकाणी दोन केंदे उभी केली आहेत. राज्यातील स्थानिक विपेत्यांची मागणी पूर्ण करण्याचे काम या केंद्रामार्फत होणार आहे. सात लाख चौरस फूट क्षेत्रफळामध्ये विस्तारलेल्या या केंद्रांमध्ये नव्या उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्यामध्ये फ्लिपकार्टच्या 12 पुरवठासाखळी सुविधा उपलब्ध आहेत, ज्या मार्फत विपेत्यांना आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जातो.
फ्लिपकार्टचा तामिळनाडू, केरळात विस्तार
ऑनलाइन कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आपल्या किराणा व्यवसायाचा विस्तार येत्या काळामध्ये तामिळनाडू, केरळमध्ये करणार आहे. त्यासाठी कंपनीने तयारी केली आहे. तामिळनाडूतील कोईमत्तूर, मदुराई, तिरुचिरापल्ली आणि केरळमधील एर्नाकुलम या शहरांमध्ये उत्तम दर्जाच्या किराणा साहित्याची व्यवस्था कंपनीकडून केली जाणार आहे. दररोजच्या लागणाऱया वस्तूंची पूर्तता घरापर्यंत पोहच करण्याची फ्लिपकार्टने योजना आखली आहे. कोईमतूरमध्ये स्थापन केलेल्या किराणा केंद्रात अकराशे जणांना रोजगाराची संधी फ्लिपकार्टने प्राप्त करून दिली आहे.