नवी दिल्ली
दुसऱया तिमाहीअखेर बँकिंग क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाच्या निव्वळ नफ्यात चक्क 128 टक्के इतकी लक्षणीय वाढ नोंदली गेली आहे. यावर्षी दुसऱया तिमाहीअखेर बँकेने 1 हजार 679 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, तर मागच्या वर्षी समान कालावधीत तो 737 कोटी रुपये इतका होता. बँकेचे एकूण व्याज उत्पन्न 7 टक्के इतके वाढून 7 हजार 508 कोटी रुपये झाले आहे. मागच्या वर्षी ते 7 हजार 28 कोटी रुपये इतके होते. बाद कर्जाच्या तरतुदीत 34 टक्के इतकी घट बँकेने नोंदवली असल्याची माहितीही बँकेने दिली आहे.