प्रतिनिधी / पणजी
शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दि. 1 ऑगस्ट रोजी होणाऱया बकरी ईदाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अखिल गोवा मुस्लिम जमातच्या सदस्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा, पशुसंवर्धन व पशु सेवा संचालनालयाचे संचालक संतोष देसाई, गोवा मीट कॉम्प्लेक्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आर.एच प्रभुगांवकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी बैठकीला संबोधताना सांगितले की डीएएचव्हीएसतर्फे जारी केलेल्या एसओपीचे अनुसरण व्हावे. तसेच एसओपी आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱयांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या कठीण काळात नियमांचे पालन करुन शांती व प्रेमाने ईद साजरी करुया.
या बैठकी दरम्यान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सदस्यांची तक्रारी देखील ऐऊन घेतल्या व त्यावर उपाययोजना सुचविल्या.