नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्टार मल्ल बजरंग पुनिया व संगीता फोगट यांनी कुटुंबिय व निकटवर्तियांच्या उपस्थितीत हिंदू पद्धतीने विवाह केला. हरियाणातील बलाली येथे बुधवारी रात्री हा सोहळा संपन्न झाला. अर्थात, पारंपरिक 7 ऐवजी या नवजोडप्याने 8 फेरे घेतले, हे या सोहळय़ाचे अनोखे वैशिष्टय़ ठरले आणि या जोडप्याने आठवी फेरी घेतली ती ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहिमेला पाठबळ दर्शवण्यासाठी!
फोगट भगिनींनी मॅटवरील कुस्तीत आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे. आमीर खानच्या दंगल चित्रपटामुळे हे कुटुंब विशेष प्रकाशझोतात आले. संगीताची मोठी बहीण बबिता व विनेश हे विवाहबद्ध झाले, त्यावेळी आपल्या विवाह सोहळय़ात देखील त्यांनी पारंपरिक 7 ऐवजी 8 फेरेच घेतले होते. तीच परंपरा आता बजरंग व संगीता यांनीही कायम राखली आहे.