ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील खलिस्तानी दहशतवादी संघटना असलेल्या ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’च्या दोन दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली.
भूपेंदर उर्फ दिलावर सिंह आणि कुलवंत सिंह अशी अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोघेही पंजाबमधील लुधियानाचे रहिवासी आहेत.
उत्तर-पश्चिम दिल्लीत झालेल्या चकमकीदरम्यान या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळील मोठ्याप्रमाणवर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सहा पिस्तुले आणि 40 काडतुसांचाही समावेश आहे.