ऑनलाईन टीम / नवी मुंबई
काही दिवसांपुर्वी मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या अमानवीय अत्याचाराचे पडसाद देशभर उमटले होते. यानंतर दुसऱ्या – तीसऱ्या दिवशीच महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात लैंगिक अत्याचारग्रस्त गर्भवती पीडितेने आत्महत्त्या केल्याचे समोर आले होते. यावर समाजमन चांगलच ढवळून निघाले होते. अशीच मानवीयतेला काळीमा फासणारी घडना आज मुंबईतील डोंबिवलीत घडली आहे.
एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला असून हा प्रकार डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या आठ महिन्यापासुन सुरु असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. या अत्याचार प्रकरणात ३० नराधम सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. पैकी २२ संशयिताना पोलीसांनी अटक करत आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर फरार संशयितांचा शोध सुरु असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली आहे. तर युवतीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करत याचे व्हिडिओ तयार केला होता. याच व्हिडिओच्या आधारे मुलीला वारंवार ब्लॅकमेल केले जात होते. यानंतर मुलीला मुलीला फार्म हाऊसवर नेऊन आरोपींकडून आळीपाळीने बलात्कार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. सहभागी काही आरोपींचा शोध लागला असून काहींचा अद्याप शोध सुरु असल्याचे पोलिसांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.