वारणानगर / प्रतिनिधी
ओळखीचा फायदा घेऊन बलात्कार केल्या प्रकरणी एका तरुणास कोडोली पोलीसानी अटक केली असून प्रकाश उर्फ अजित उत्तम सातपुते (वय २५ ) रा. आनंदनगर, कोडोली ता.पन्हाळा असे त्याचे नाव आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवार दि.५ रोजी सकाळी नऊच्या दरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी क्लास ला चालली होती तिला रस्त्यात अडवून धमकी देऊन दुचाकीवरून तिला वारणानगर येथील कॅनॉल जवळील रूम वर नेहून तिच्यावर बलात्कार केला. पिडीत मुलगी घरी गेल्यावर ही बाब घरच्यांना सांगितल्यावर त्यांनी कोडोली पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला होता
या प्रकरणी प्रकाश यास अटक करून त्याच्यावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून आज सोमवार दि.६ रोजी कोल्हापूर न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात अली. पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ए. डोईजड व पोलिस उपनिरीक्षक सागर पोवार करत आहेत.