इस्लामाबाद / वृत्तसंस्था
बलुचिस्तानमधील केच जिह्यात सुरक्षा दलाच्या चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शुक्रवारी दहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले. दहशतवाद्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास हा हल्ला केल्याचे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादीही ठार झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बलुचिस्तानमध्ये अनेक दिवसांपासून हिंसक बंडखोरी सुरू आहे. बलुच बंडखोर गट यापूर्वी या भागात चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला लक्ष्य करून हल्ले करत आहेत.