लखनौ : उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक 2022 वरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष राम अचल राजभर आणि बसपच्या विधिमंडळ गटाचे नेते लालजी वर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. बसपमधून हाकलण्यात आलेले दोन्ही नेते सायकलवर स्वार होऊ शकतात अशी चर्च आहे. दोघेही सातत्योन सप अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या संपर्कात आहेत. बसप आणि सपने लोकसभा निवडणूक आघाडी करत लढविली होती. पण तरीही भाजपने बाजी मारल्याने बसप आणि सप यांची बहुचर्चित आघाडी संपुष्टात आली आहे.
सप आता रालोद तसेच अन्य छोटय़ा पक्षांसोबत आघाडी करू पाहत आहे. तर काँग्रेसला सोबत घेण्याचा मायावती यांचा कुठलाच विचार नसल्याचे मानले जाते. उलटपक्षी मायावती आता भाजपबद्दल मवाळ झाल्याचे चित्र आहे.