वार्ताहर / हलगा
बस्तवाड व मास्तमर्डी ग्राम पंचायतवर बहुसंख्येने नवीन अमेदवार विजयी झाली आहेत. मतदारांनी यावेळेला आपला कौल या नवीन सदस्यांना दिल्यामुळे अनेक मतदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. बुधवार दि. 30 रोजी झालेल्या ग्राम पंचायत मतदान निकालामध्ये पहिल्या फेरीमध्ये हलगा परिसरातील बस्तवाड व मास्तमर्डी या ग्राम पंचायतचा समावेश होता. नियोजित वेळेमध्ये मतमोजनी सुरुवात झाली पण निकालाला वेळ लागला होता. जस जसे प्रत्येक प्रभागाचे निकाल आले. यावेळी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उडवून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी विजयी उमेदवारांना भगवे फेटे बांधून व हार घालून त्यांचे अभिनंदन करण्यात येत होते. बस्तवाड ग्राम पंचायत मध्ये बस्तवाड, कोंडसकोप व कमकारहट्टी गावांचा समावेश आहे. बस्तवाड गावामध्ये 4 प्रभाग असून प्रभाग क्रं. ख1 मध्ये विजयी उमेदवार भरमा गौडकच्यापगोळ, तवनाप्पा लोहार, शिल्पा पाटील, सविता पाटील, प्रभाग क्रं. 2 मध्ये रामा काकतकर, मिनाक्षी काकतकर, बाहुबली कामाल, सुष्मा तेली, प्रभाग क्रं. 3 मध्ये जोतिबा चौगुले, मनोहर मुचंडी, प्रेमा मरगाणाचे, सोनाली लोहार, प्रभाग क्रं. 4 मध्ये समीर सनदी, राजू बडवाण्णावर, मल्लाप्पा दोड्डकल्लावर, रेणुका गुडय़ापगोळ, कोंडसकोप प्रभाग क्रं. 5 मध्ये अर्जुन पाटील, सुरेखा पाटील, प्रभाग क्रं. 6 मध्ये विठ्ठल सांबरेकर, शोभा डोंगरे, लक्ष्मी सांबरेकर, रामा पाटील, कमकारहट्टी प्रभाग 7 मध्ये रमेश हुलसीगरद, महादेवी पाटील, राजू मकानदार विजयी झाले आहे. तर श्रीदेवी लक्ष्मण खंची हे अविरोध निवड झाले आहेत.
मास्तमर्डी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रामध्ये मास्तमर्डी गावामध्ये प्रभाग क्रं, 1 मध्ये बाळू कुरंगी, सागर कुरंगी, अन्नपूर्णा बुराणी, सुशिला जंगळी, प्रभाग क्रं. 2 मध्ये मारुती जंगळी, महानंदा मरिकट्टी, सविता केळीकेसर, रेखा कुरबर, रेणुका पाटील, बसरीकट्टी येथील प्रभाग 4 मध्ये प्रशांत कल्लाणाचे, दिलीप कोंडसकोप, गीता कोलकार, प्रभाग 5 मध्ये तानाजी चौगुले, सागर शेरेकर, लक्ष्मी चौगुले विजयी झाले आहेत.
विजयी उमेदवारांनी गावात आल्यावर त्यांच्या समर्थकांनी आरती ओवाळून व भगवे फेटे बांधून त्यांचे स्वागत केले. विजयी उमेदवारांनी आपल्या प्रभागामध्ये सर्व मतदार बंधुचे घरोघरी जाऊन आभार व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजीही केली आहे.