‘मराठी पाऊल पडते पुढे’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद : लोकमान्य रंगमंदिर पुन्हा एकदा रसिकांनी फुलले
प्रतिनिधी /बेळगाव
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्राच्यावतीने बहारदार गीत-संगीत-नाटय़-नृत्याचा कार्यक्रम झाला. 1960 च्या दशकातील अजरामर मराठी गाणी सादर करून कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. कोरोनाच्या एका पर्वानंतर पुन्हा एकदा लोकमान्य रंगमंदिर मराठी रसिकांनी फुलले होते. टाळय़ा, शिट्टय़ांनी उपस्थितांनी गाण्यांना दाद दिली.
रसिक रंजन, लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र व मराठी भाषा प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाची सुरुवात निलकंठ नटराज महेश्वर या नांदीने झाली. श्रीरंगा कमलाकांता हरि या गीतावर नृत्य सादर करण्यात आले. प्रभात फिल्म कंपनीच्या मनशुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची या गीताने तत्कालिन परिस्थितीचा उलगडा केला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर, सेवंतीभाई शहा, अजित गरगट्टी, सुरेश कणगली, नितीन नेर्लेकर, भारती कित्तूर, डी. जी. कुलकर्णी, डी. पी. जोशी, परशराम माळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक विनायक जाधव यांनी केले. संतोष गुरव, स्नेहल जाधव, विनायक नाईक, विजय नरगुंदे, धनश्री गुरव, वैष्णवी कुलकर्णी, पल्लवी श्रेयकर, शिवानी जमखंडी, अभिन्या हलगी, श्रावणी गुरव, आर्या गुरव, मास्टर सुमित, श्रीवत्स हुद्दार, काजल धामणेकर, तन्मयी सराफ, काजल पाटील, सानिका ठाकुर, रिहान मुल्ला, अब्दुल सिद्दीकी, अनिस कित्तूर या कलाकारांनी कार्यक्रमात भाग घेतला. प्रा. अनिल चौधरी आणि श्रीया हुद्दार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या धर्तीवर मराठीसाठी काम करणार : किरण ठाकुर
जगभरात 20 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. ही एक भाषा भगिनी असून अन्य कोणत्याही भाषेचा द्वेष न करता आपले कार्य करत आहे. भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या धर्तीवर मराठी भाषा प्रचार सभा स्थापन केली जाणार आहे. या प्रचार सभेच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱयात मराठी भाषेच्या परीक्षा घेतल्या जातील. बेळगावच्या आरपीडी महाविद्यालयामध्येही याचे केंद्र सुरू केले जाणार असून यासाठी काम सुरू असल्याची माहिती लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांनी कार्यक्रमादरम्यान दिली.
‘एक लाजरा न् साजरा’ने मिळविली दाद
मराठी चित्रपट क्षेत्रातील एक अजरामर गाणे ‘एक लाजरा न् साजरा मुखडा’ सानिका ठाकुर आणि अनिस कित्तूर यांनी सादर केले. ठसकेबाज पद्धतीने सादर केलेल्या या गाण्याला तितक्मयाच तोलामोलाची संगीत साथ मिळाल्याने उपस्थित रसिकांनी टाळय़ा आणि शिट्टय़ांची दाद दिली. याचबरोबर पतंग उडवीत होते, या रावजी बसा भावोजी, काय ग सखू, लख लख चंदेरी तेजाची अशी गीते सादर केली. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.