चित्रा फडते उपसरपंच
वार्ताहर /मडकई
बांदोडा पंचायतीच्या सरपंचपदी सुखानंद गावडे यांची तर उपसरपंच म्हणून चित्रा फडते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सरपंचपदासाठी सुखानंद गावडे यांचे नाव अजय नाईक यांनी सुचवीले तर राजू बांदोडकर यांनी त्याला अनुमोदन दिले. उपसरपंच चित्रा फडते यांचे नाव मुक्ता नाइं&क यांनी सुचवीले तर मनिषा कुर्पासकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी सर्व अकराही पंचसदस्य उपस्थीत होते. अमजत लष्करवाले यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिले व पंचायत सचिव सच्चीत गावडे यांनी त्यांना सहाय्य केले.
बांदोडा पंचायत क्षेत्राचा विकास करण्यासाठी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे सहकार्य खूप मोलाचे ठरणार आहे. माधवराव ढवळीकर ट्रस्टचे पंचायतीला साहाय्य लाभत असते. त्यासाठी मिथील ढवळीकर यांच्याकडून हे सहाय्य घेतले जाईल. विकास करताना कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे सरपंच श्री. गावडे यांनी सांगितले.