वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात बुधवार दि. 8 रोजी आणखी 24 जणांना कोरोना बाधा झाली असून बाधितांची संख्या 313 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली. अज 332 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. बागलकोट 6, जमखंडी 3, मुधोळ 8, हुनगुंद 5 तर बदामीत 2 पॉझिटिव्ह आढळले.
बागलकोट विनायकनगर येथील रुग्ण क्रमांक 12062 च्या द्वितीय संपर्कात आलेल्या 39 वर्षाच्या व्यक्तीस 37 वर्षाच्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गुळेदगुड्ड येथे मरण पावलेल्या बाधित रुग्ण क्रमांक 11211 च्या द्वितीय संपर्कात आलेल्या बागलकोट हळेपेटे येथील 55 वर्षाच्या व्यक्तीला बाधा झाली. कलादगी येथील रुग्ण क्रमांक 15301 च्या द्वितीय संपर्काने 38 वर्षाच्या पुरुषाला बाधा झाली.
जमखंडी तालुक्यातील हिप्परगी येथील 12 वर्षाच्या मुलीला, 52 वर्षाच्या पुरुषाला, 22 वर्षाच्या युवतीला बाधा झाली असून कोणाच्या संपर्काने याचा शोध वैद्यकीय अधिकारी घेत आहेत. मुधोळ येथील 45 वर्षाची महिला, 41 वर्षाचा पुरुष, बागलकोटचा 59 वर्षाचा पुरुष यांना कोरोना बाधा झाली.
रुग्ण क्रमांक 15304 च्या द्वितीय संपर्काने मुधोळ येथील बादगट्टी भागातील 31 वर्षाची महिलेला, 61 वर्षाच्या महिलेला, 9 व 5 वर्षाच्या मुलगा, 38 वर्षाच्या महिलेला, 19 वर्षाच्या युवकाला बाधा झाली. रुग्ण क्रमांक 10769 च्या संपर्काने इलकल येथील 35 वर्षाच्या महिलेला, 45 व 58 वर्षाच्या पुरुष, 62 वर्षाच्या वृद्धाला बाधा झाली.
गुजरात अहमदाबाद येथून परतलेल्या बदामी येथील सुळेकेरीच्या 37 वर्षाच्या पुरुषाला बागलकोटच्या 59 वर्षाच्या पुरुषाला, गुळेदगुड्डच्या 56 वर्षाच्या महिलेला, इलकलच्या 58 वर्षाच्या पुरुषाला बाधा झाल्याचा अहवाल आला.
अद्याप जिल्हय़ात 1138 अहवाल येणे बाकी आहेत. एकूण 15596 नमुन्यापैकी 14046 निगेटिव्ह, 313 पॉझिटिव्ह, 7 मृत्यू, 150 बरे झाले, 156 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.