वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात मंगळवारी 136 जणांना कोरोनाबाधा झाली तर 81 रुग्ण कोरोनामुक्त तर 2 बळी गेले असल्याने आतापर्यंत एकूण 6250 बाधित, 5465 रुग्ण कोरोनामुक्त व बळींची संख्या 76 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. के. राजेंद्र यांनी दिली.
मंगळवारी हुनगुंद तालुक्यात 41, मुधोळ 29, जमखंडी 27, बागलकोट 19, बदामी 15, बिळगी 3 व अन्य जिल्हय़ातील 2 असे एकूण 136 बाधित झाले. जिल्हय़ात आतापर्यंत 62007 व्यक्तींचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. त्यापैकी 55,142 निगेटिव्ह, 6350 पॉझिटिव्ह, 206 व्यक्तींचे अहवाल येणे शिल्लक असून 809 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.